Galaxy S24 सीरीज सॅमसंग यावर्षी लॉन्च करेल. ही सीरीज अनेक एआय फीचर्ससह सादर करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. या सीरीजअंतर्गत कंपनी प्रत्येक वेळेप्रमाणे तीन मॉडेल सादर करणार आहे. जानेवारीच्या मध्यात त्यांचे लाँचिंग होईल.
जगातील आघाडीची टेक कंपनी अॅपल दरवर्षी एक नवीन सीरिज लाँच करते. अशा परिस्थितीत 2024 मध्ये ही कंपनी एक नवीन सीरीज आणणार आहे जी आयफोन 16 सीरीज असेल. ही आगामी सीरीज iPhone 15 च्या तुलनेत अनेक अपग्रेड केलेल्या वैशिष्ट्यांसह सादर केली जाईल.
advertisement
Tech News: 8 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतात या जबरदस्त वॉशिंग मशीन; झटपट स्वच्छ होतील कपडे
Vivo देखील यंदाच्या वर्षी सुरुवातीला प्रीमियम सेगमेंटमध्ये X100 सीरीज लॉन्च करण्याचा विचार करत आहे. ही सीरीज जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होणार आहे. कंपनीने पुष्टी केली आहे की या सीरीजमधील कामगिरीसाठी MediaTek Dimension 9300 Soc प्रोसेसर ऑफर केला जाईल. या येणाऱ्या सीरीजमध्ये 5,400 mAh बॅटरीचा पॉवर सपोर्ट दिला जाईल अशी अपेक्षा आहे.
OnePlus 12 सीरीज 23 जानेवारी 2024 ला लॉन्च होणार आहे. त्याच्या प्रोसेसरबद्दल आधीच पुष्टी केली गेली आहे की यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 चिपसेट दिला जाईल. यामध्ये पॉवर देण्यासाठी 5.4000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात येणार आहे.