TRENDING:

सर्वात स्वस्त Laptop च्या किंमतीत कपात! Jio ने कमी केले लॅपटॉपचे दर 

Last Updated:

Cheapest Laptop: कमी बजेटमध्ये नवीन लॅपटॉप शोधत आहात का? बरं, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओने त्यांच्या सर्वात परवडणाऱ्या लॅपटॉपची किंमत कमी केली आहे, ज्यामुळे JioBook 11 आणखी परवडणारा झाला आहे. हा लॅपटॉप खरेदी करण्यासाठी किती खर्च येईल? चला जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सर्वात स्वस्त लॅपटॉप कोणाला खरेदी करायचा नाही? महागाईच्या या युगात, जिओने त्यांचा सर्वात परवडणारा लॅपटॉप आणखी परवडणारा बनवून लोकांना मोठी भेट दिली आहे. खरं तर, कंपनीने जिओबुक 11 ची किंमत लक्षणीयरीत्या कमी केली आहे. ड्युअल-बँड वाय-फाय आणि Android 4G ने सुसज्ज असलेला हा लॅपटॉप Officeचाही अ‍ॅक्सेस फ्रीमध्ये दिला जातोय. भारतीय बाजारात हा लॅपटॉप कोणत्या किमतीत लाँच करण्यात आला होता आणि किंमत कपातीनंतर तो आता कोणत्या किमतीत उपलब्ध आहे? चला जाणून घेऊया.
जिओ बुक 11
जिओ बुक 11
advertisement

JioBook Price in India: जुनी आणि नवीन किंमत

टेलिकमटॉकनुसार, 4G LTE कनेक्टिव्हिटी असलेला हा परवडणारा लॅपटॉप ग्राहकांसाठी 16 हजार 499 रुपयांना लाँच करण्यात आला होता. आता, किंमत 4009 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. किंमतीत कपात झाल्यानंतर, तुम्ही आता हा लॅपटॉप Amazon वर ₹12490 मध्ये मिळवू शकता. तुम्हाला तो Amazon, Jio Mart आणि Jio Stores वर देखील मिळेल.

advertisement

CCTV कॅमेराहून जास्त धोकादायक आहे वाय-फाय राउटर! करु शकते तुमची हेरगिरी

JioBook 11 Specifications

990 ग्रॅम वजनाच्या या सुपर-लाईट आणि परवडणाऱ्या लॅपटॉपमध्ये 11.6-इंच स्क्रीन आहे. यात 4GB RAM, ड्युअल-बँड वाय-फाय, सिम कार्डद्वारे 4G LTE, अँटी-ग्लेअर HD डिस्प्ले आणि उत्कृष्ट आवाजासाठी स्टीरिओ स्पीकर्स आहेत.

WhatsApp वरुनही कमवू शकता पैसे? 99% लोकांना माहितीच नाही ही ट्रिक

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

Amazon वरील लिस्टिंगनुसार, हा लॅपटॉप एकदा चार्ज केल्यानंतर 8 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतो. एक वर्षाच्या वॉरंटीसह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये Mediatek MT 8788 ऑक्टा-कोर प्रोसेसर, 4GB LPDDR4 रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवता येते. जास्त पैसे खर्च न करता नवीन गोष्टी शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा लॅपटॉप परिपूर्ण आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
सर्वात स्वस्त Laptop च्या किंमतीत कपात! Jio ने कमी केले लॅपटॉपचे दर 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल