सायबरसुरक्षा फर्म CloudSEKच्या मते, या वेबसाइट्स पेमेंट आणि पर्सनल माहिती चोरतात. ज्याचा वापर नंतर आर्थिक फसवणूक किंवा ओळख चोरीसाठी केला जाऊ शकतो. मागील रँडम स्कॅमच्याविरुद्ध, ब्लॅक फ्रायडे सेल घोटाळे हे एक मोठे, ऑर्गनाइज़्ड ऑपरेशन आहे, ज्यामध्ये बनावट साइट्स Apple, Samsung, Xiaomi आणि Amazon सारख्या प्रमुख ब्रँड म्हणून ओळखल्या जातात.
घरात CCTV कॅमेरा लावाल असेल तर या गोष्टींकडे ठेवा लक्ष! थोडीशी चूक पडेल महागात
advertisement
CloudSEKच्या मते, या वर्षीच्या ब्लॅक फ्रायडे सेलपूर्वी 2000 हून अधिक बनावट वेबसाइट्स शोधण्यात आल्या. या साइट्समध्ये खऱ्या ऑनलाइन स्टोअर्सचे सर्व प्रकार आहेत. जसे की उत्सवाचे बॅनर, काउंटडाउन क्लॉक आणि बनावट रिव्ह्यू. स्कॅमर खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी या फीचर्सचा वापर करतात. साइट खरी आहे की बनावट आहे याची पडताळणी न करता ग्राहकांना जलद खरेदी करण्यास भाग पाडणे हे त्यांचे ध्येय आहे. हल्लेखोर प्रामुख्याने पेमेंट माहिती आणि पर्सनल डिटेल्सला लक्ष्य करतात, ज्याचा वापर आर्थिक चोरी किंवा ओळख फसवणूकीसाठी केला जाऊ शकतो.
CCTV कॅमेराहून जास्त धोकादायक आहे वाय-फाय राउटर! करु शकते तुमची हेरगिरी
टाळण्यासाठी काय करावे?
- आकर्षक ऑफरच्या मोहात पडू नका. घोटाळे टाळण्यासाठी, प्रथम URL तपासा आणि फक्त अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करा.
- 70 ते 90 टक्के मोठ्या प्रमाणात सूट देणाऱ्या साइट्स टाळा.
- स्पेलिंगच्या चुकांसाठी URL तपासा.
