Jalna News : बाटली आडवी, दारूवर फिरवला जेसीबी, जालना पोलिसांची मोठी कारवाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
40 गुन्ह्यातील एक लाखांची जप्त दारू आज पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केली. न्यायालयाच्या आदेशानंतर जवळपास 1 लाखाची जप्त दारू नष्ट करण्यात आली.
जालना : जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या 40 गुन्ह्यातील एक लाखांची जप्त दारू आज पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केली. न्यायालयाच्या आदेशानंतर जवळपास 1 लाखाची जप्त दारू नष्ट करण्यात आली. जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या 40 गुन्ह्यातील जप्त दारू पोलिसांनी नष्ट केलीय.
न्यायालयाच्या आदेशानंतर जवळपास 1 लाखाची दारू जालन्यातील तालुका पोलिसांनी नष्ट केली आहे. तालुका पोलीस ठाण्यात जप्त असलेल्या 30 गुन्ह्यातील दारू न्यायालयाच्या परवानगीने आणि दहा गुन्ह्यातील दारू उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या परवानगीने जवळपास 1 लाख रुपयाचा हा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. पोलिसांनी आज तालुका पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून दारू नष्ट केली आहे.
advertisement
यावेळी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी त्याचबरोबर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, उत्पादन शुल्क अधिकारी संजय ताकवले, आणि इतर कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती.
दरम्यान, जालना तालुका पोलिसांनी मागील वर्षभरात वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून ही दारू जप्त केली होती. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची देशी विदेशी दारूच्या बाटल्या जेसीबी द्वारे खड्डा खोदून त्यात ही दारू टाकून नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे जालना जिल्ह्यातील अवैध मार्गाने दारूची विक्री करणाऱ्यांवर चाप बसेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. यावेळी राज्य उत्पादन विभाग आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
November 28, 2025 3:08 PM IST

