Kunal Ganjawala Surname : कुणालची फॅमिली कशी झाली 'गांजावाला'? सिंगरने स्वत:चं सांगितलं

Last Updated:
'भीगे होठ तेरे' या प्रसिद्ध गाण्याचा गायक कुणाल गांजावाला. आजवर तो त्याच्या गाण्यांमुळे ओळखला गेला पण त्याचं युनिक आडनाव देखील नेहमीच चर्चेत राहिलं. त्याच्या आडनावामागची स्टोरी त्याने सांगितली.
1/7
'चन्ना वे', 'सलाम', 'ओ हमदम सोनियो रे', 'तौबा तौबा', 'दिल ना दिया' सारखी हिट गाणी इंडस्ट्रीला देणारा प्रसिद्ध गायक म्हणजे कुणाल गांजावाला. या सगळ्या गाण्यांमध्ये त्याचं भीगे होठ तेरे हे गाणं खूप गाजलं. आजही हे गाणं ऐकू आलं की कुणाल गांजावाला हे नाव डोळ्यांसमोर येतं. 

advertisement
2/7
कुणाल गांजावालाने अनेक हिट गाणी गायली आहेत. त्याची अनेक गाणी अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतात. कुणाल त्याच्या गाण्यांबरोबरच त्याच्या आडनावामुळेही कायम चर्चेत असायचा. गांजावाला हे आडनाव इतर आडनावांपेक्षा खूपच वेगळं आहे. कुणालची फॅमिली गांजावाला कशी झाली यामागे एक इंटेरेस्टिंग स्टोरी आहे. 

3/7
अलीकडील एका पॉडकास्टमध्ये कुणाल गांजावालाने त्याच्या आडनावामागची स्टोरी सांगितली. कुणालने सांगितलं की, ब्रिटिश राजवटीत त्यांच्या कुटुंबाचा औषधी गांजाच्या  लागवडीचा व्यवसाय होता. हा व्यवसाय पूर्ण सरकारी परवानगीसह चालायचा.

4/7
त्या काळी ब्रिटिश सरकार त्यांच्या कुटुंबाकडून हे पिक घेऊन कर्करोगाच्या रुग्णांसाठी अफूपासून बनणारी इंजेक्शन्स तयार करत असे. या सेवेसाठी सरकारने त्यांच्या कुटुंबाला करमाफी दिली आणि 'रावसाहेब' ही पदवीही दिली. त्यामुळे हे नाव नंतर त्यांचे आडनाव बनले.

5/7
कुणाल यांनी सांगितले की, त्यांचे पूर्वज 1942 पर्यंत या व्यवसायात होते. पण 'भारत छोडो' आंदोलनादरम्यान महात्मा गांधींनी स्वावलंबनाचं आवाहन केलं. त्यानंतर कुटुंबाने हा जुना व्यवसाय पूर्णपणे बंद केला.

6/7
देशातील बदलत्या परिस्थिती पाहून कुटुंबाने नवीन उद्योग निवडला आणि स्टील फर्निचर बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू हा त्यांचा मुख्य व्यवसाय झाला पण त्यांचं गांजावाला हे आडनाव मात्र कायम राहिलं.  

7/7
कुणाल पुढे म्हणाला, आज अनेक लोक माझ्या आडवानाचे विनोद करतात. आडनावाचा वेगळा अर्थ काढतात किंवा त्याचा अर्थ विचारतात. सोशल मीडियावरही मजेशीर कमेंट्स येतात. पण या आडनावामागे आमचा खरा इतिहास आहे.

Supreme Court On Local Body Election : आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे आदेश...
आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व
  • आरक्षण ओलांडलेल्या नगर परिषद, नगर पंचायतींचे काय होणार? सुप्रीम कोर्टाने महत्त्व

View All
advertisement