काही भागात हेल्मेट घालून पेट्रोल पंपावर गेलो तरच तुम्हाला पेट्रोल पंपावर इंधन भरता येतं. जर तुम्ही तिथे हे नियम पाळले नाही तर तुम्ही तुमच्या बाईक किंवा स्कूटरमध्ये पेट्रोल भरू शकणार नाही आणि तुम्हाला रिकाम्या हाताने परतावे लागेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही नियमांबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
तुम्ही चुकूनही इंधन स्टेशनवर धुम्रपान करू नये, ते प्राणघातक ठरू शकते आणि तुमचा जीव जाऊ शकतो, एवढंच नाही तर पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा जीव धोक्यात येऊ शकतो.
advertisement
जर तुम्ही तुमच्या बाईक किंवा स्कूटरमध्ये पेट्रोल भरणार असाल तर तुम्ही हेल्मेट घालाच कारण त्याशिवाय तुमच्या वाहनात पेट्रोल भरलं जाणार नाही, याशिवाय बाटलीत पेट्रोल किंवा डिझेल कोणालाही दिले जात नाही.
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना तुम्ही कधीही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरू नये कारण अशा उपकरणांमुळे आग होऊ शकते.
पेट्रोल पंपावर फोनवर बोलणं टाळा, कारण असं केल्याने देखील रेडिओ किरणांमुळे आग लागू शकते.
