पण चीनने हे आव्हान स्वीकारले आहे. चीनने आता असा फोन बनवला आहे जो फक्त स्मार्ट नाही, तर माणसाप्रमाणे फोनची स्क्रीन 'पाहतो', ॲप्स उघडतो, फॉर्म भरतो आणि एकाच कमांडवर गुंतागुंतीची कामे स्वतःहून पूर्ण करतो. चला जाणून घेऊया चीनच्या या कमाल 'एजेन्टिक एआय (Agentic AI)' फोनबद्दल आणि त्याच्या आश्चर्यकारक फीचर्सबद्दल.
ZTE आणि ByteDance ची नवी क्रांती
advertisement
टेक इंडस्ट्रीत मोठी खळबळ उडवून देणारा हा 'एजेन्टिक एआय' स्मार्टफोन चीनच्या ZTE आणि TikTok ची पालक कंपनी असलेल्या ByteDance ने मिळून तयार केला आहे. या प्रोटोटाईप फोनचे नाव Nubia M153 आहे.
हा फोन Android प्रणालीवर काम करतो आणि यात ByteDance चा शक्तिशाली AI एजंट Doubao समाविष्ट करण्यात आला आहे. चीनमध्ये करोडो लोक सध्या हा 'Doubao' AI एजंट वापरत आहेत. या AI एजंटला पूर्णपणे फोनचे नियंत्रण (Control) देण्यात आले आहे. तो स्वतः स्क्रीन वाचतो, यूजरच्या कामासाठी योग्य ॲप निवडतो, अगदी एखाद्या मानवी बोटाने फोन चालवावा तसा हा AI फोन चालवतो.
हा AI काय काय करू शकतो?
या फोनमध्ये AI काय काय करू शकतो, हे काही उदाहरणे वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही फक्त सुरुवात आहे. फक्त फोटोवरून हॉटेल बुकिंग एका डेमोमध्ये फोनच्या यूजरने हॉटेलच्या बाहेरच्या इमारतीचा एक फोटो घेतला आणि फक्त कमांड दिली, "Book a hotel for tonight." AI ने फोटो ओळखला, हॉटेलचे ॲप उघडले, बुकिंगची तारीख टाकली, दर तपासले, इतकंच नाही तर पाळीव प्राण्यांना (Pet Policy) परवानगी आहे की नाही, हे देखील चेक केले आणि मिनिटांत बुकिंग पूर्ण केली.
दुसऱ्या डेमोमध्ये यूजरने कमांड दिली, "Book someone to stand in line for me." (माझ्यासाठी रांगेत उभे राहण्यासाठी एका माणसाला बुक कर). AI ने स्वतः योग्य ॲप निवडले, फॉर्म भरला, सेवा बुक केली आणि कन्फर्मेशन दाखवले. यूजरला कोणत्या ॲपचा वापर करायचा हे सांगावेच लागले नाही.
हा एक अत्यंत पॉवरफुल फीचर आहे. AI ने GPS चा वापर करून योग्य टॅक्सी ॲप उघडले आणि राईड बुक केली. एवढेच नाही, तर प्रवासादरम्यान ड्रॉप लोकेशन (Drop Location) बदलण्याची कमांड दिली असता, AI ने ॲप आणि टॅक्सी सिस्टीम दोन्हीमध्ये तो बदल त्वरित अपडेट केला. असा गुंतागुंतीचा बदल करणे सध्याचे कोणतेही ग्लोबल AI असिस्टंट करू शकत नाहीत.
फोनचे हार्डवेअर आणि AI मॉडेल
हा प्रोटोटाईप फोन Qualcomm च्या नवीन Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट आणि 16 GB रॅमच्या मदतीने काम करतो.
हा AI क्लाऊडशी जोडलेले मोठे निर्णय घेतो.
हा फोनच्या आत 'हात-पाय' म्हणून काम करतो आणि स्क्रीन कंट्रोल करतो.
हा एक असा OS-नेटिव्ह GUI एजंट आहे, ज्याला चिनी मोबाईल यूआय (UI) च्या प्रवाहावर खास ट्रेन करण्यात आले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगायचे झाल्यास, सध्या जगात कोणत्याही iPhone किंवा Samsung फोनमध्ये अशा प्रकारचा 'एजेन्टिक एआय' उपलब्ध नाही. चीनने स्मार्टफोनच्या भविष्याची एक नवी आणि जबरदस्त झलक जगासमोर ठेवली आहे.
