Vodafone Idea चा 84 दिवसांचा प्लॅन
Vodafone-Idea ने 470 रुपये किमतीत डेटाशिवाय स्वस्त प्लॅन लॉन्च केले आहेत. या प्लॅनमध्ये युजर्सना 84 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात येत आहे. Voda च्या या प्लॅनमध्ये यूझर्सना भारतभरातील कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय हा प्लॅन फ्री नॅशनल रोमिंगसह येतो. Airtel सारख्या Vodafone-Idea च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 900 फ्री SMS चा लाभ देखील मिळणार आहे.
advertisement
Flipkart Sale मध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळतंय बंपर डिस्काउट! उरले अखेरचे 4 दिवस
Vi चा 365 दिवसांचा प्लॅन
Vodafone-Idea ने 84 दिवसांचा तसेच 365 दिवसांचा प्लॅन लॉन्च केला आहे. या व्हॉइस ओनली प्लॅनची किंमत 1,849 रुपये आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यूझर्सना भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह 3,600 फ्री एसएमएसचा लाभ मिळेल. याशिवाय यूजर्सना फ्री नॅशनल रोमिंगचा लाभही दिला जाणार आहे.
Samsung आणतेय आतापर्यंतचा सर्वात स्लिम स्मार्टफोन! पहा कशी असेल डिझाइन
हा प्लॅन हटवला
Vi ने गेल्या आठवड्यात लाँच केलेल्या 1,460 रुपयांचा व्हॉईस-ओन्ली प्लॅन त्यांच्या वेबसाइटवरून काढून टाकला आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 270 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात होती. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, हा प्लॅन संपूर्ण भारतात मोफत नॅशनल रोमिंग आणि अनलिमिटेड कॉलिंगसह लॉन्च करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 100 फ्री SMSचा लाभ दिला जात होता.
