Flipkart Sale मध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळतंय बंपर डिस्काउट! उरले अखेरचे 4 दिवस
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Top 5 Smartphone Deals: तुम्हीही खूप दिवसांपासून नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिन सेलला मुकले असाल, तर कंपनी तुमच्यासाठी आणखी एक संधी घेऊन आली आहे.
Flipkart Month End Mobile Festival Sale: गेल्या काही दिवसांपासून फ्लिपकार्टवर रिपब्लिक डे सेल सुरू होता. ज्यामध्ये स्मार्टफोन्सवर अनेक जबरदस्त डील्स पाहायला मिळत होत्या. हा सेल 26 जानेवारीच्या रात्री संपला. त्याच वेळी, आता कंपनीने आणखी एक नवीन सेल जाहीर केला आहे. खरंतर, आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मंथ एंड मोबाईल फेस्टिव्हल सेल सुरू झाला आहे. हा सेल 27 जानेवारीपासून सुरू झाली असून 31 जानेवारीपर्यंत लाइव्ह राहील. आम्ही तुमच्यासाठी या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या 5 सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन डीलची शॉर्टलिस्ट केली आहे. या डील्सवर एक नजर टाकूया...
OPPO K12x 5G
Oppo चे हे डिव्हाईस सध्या Flipkart सेलमध्ये अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन 16,999 रुपयांना लॉन्च केला होता पण आता तुम्ही फक्त 12,999 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करु शकता. BOBCARD EMI ऑप्शनसह, तुम्हाला फोनवर 1500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळत आहे. तर बाय मोअर, सेव्ह मोअर ऑफरसह फोनवर 1,000 रुपयांची एक्स्ट्रा सूट उपलब्ध आहे.
advertisement
Motorola g45 5G
हे मोटोरोला डिव्हाइस फ्लिपकार्टच्या सेलमध्ये अतिशय स्वस्त किंमतीत देखील उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन 12,999 रुपयांना लॉन्च केला होता पण आता तुम्ही फक्त 9,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर नो कॉस्ट ईएमआय ऑप्शनसह, तुम्ही दरमहा 1,667 रुपये देऊन देखील ते खरेदी करू शकता.
advertisement
CMF by Nothing Phone 1
यावेळी सेलमध्ये CMF by Nothing Phone 1 देखील अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. कंपनीने हा डिव्हाइस 21,999 रुपयांना लॉन्च केला होता पण आता तुम्ही फक्त 16,999 रुपयांमध्ये हा डिवाइस खरेदी करु शकता. BOB CARD EMI ऑप्शनसह, तुम्हाला फोनवर 1500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळत आहे.
advertisement
Vivo T3 Lite 5G
Vivo चा हा डिवाइस देखील या सेलमध्ये फक्त 10,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे तर कंपनीने हा फोन 14,499 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. सर्व बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 500 रुपयांची सूट उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्ही हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुमचा बनवू शकता.
Realme P1 5G
view commentsया सेलमध्ये Realme चे हे डिव्हाइस बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. कंपनीने हा डिव्हाइस 20,999 रुपयांना सादर केला होता पण आता तुम्ही फक्त 13,999 रुपयांमध्ये हा डिव्हाइस खरेदी करु शकता. एवढेच नाही तर फोनवर बाय मोअर, सेव्ह मोअर ऑफरसह 7 हजार रुपयांचं डिस्काउंट आणि 1 हजार रुपयांची अतिरिक्त सूट आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 27, 2025 1:47 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Flipkart Sale मध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळतंय बंपर डिस्काउट! उरले अखेरचे 4 दिवस


