जिथं वर्ल्ड कप जिंकला तिथंच पलाशने स्मृतीला घातली लग्नाची मागणी, Video समोर! इंदौरचं वऱ्हाड सांगलीत दाखल
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Palash muchhal propose smriti mandhana : स्मृती मानधनाचा लग्न सोहळा पार पडणार आहे. नवरदेव पलाश सांगलीत दाखल झालाय. अशातच पलाशने एक व्हिडिओ शेअर केलाय.
Smriti Mandhana Wedding : भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधना हिचा 23 नोव्हेंबर रोजी सांगलीत विवाह सोहळा पार पडतोय. धुमधडाक्यात हा विवाह सोहळा संपन्न होणार असून या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी मानधना कुटुंबाकडून करण्यात आलेली आहे. आणि लग्नसोहळ्यासाठी नवरदेव असणारा पलाश मूछल हा वऱ्हाड मंडळीसह सांगलीत दाखल झालाय. मानधना परिवाराकडून त्यांचं जंगी स्वागत देखील करण्यात आले आहे, या जंगी स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा
धुमधडाक्यात होणाऱ्या या लग्न सोहळ्यासाठी क्रिकेट क्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावतील, अशी माहिती मिळत आहे आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार असल्याचं मानधना कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. अशातच सोशल मीडियावर लग्न सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच पलाशने एक व्हिडीओ शेअर केलाय.
advertisement
advertisement
डी वाय पाटील स्टेडियमवर प्रपोज
पलाशने स्मृतीला सरप्राईज दिलं. लाल ड्रेस घालून स्मृतीला तयार केलं अन तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली. गाडीत बसवून तिला जिथं स्मृतीने टीम इंडियासाठी वर्ल्ड कप जिंकला, त्या डी वाय पाटील स्टेडियमवर नेलं. तिथं आधीच सगळी तयारी करून ठेवली होती.
इंदौरची सून होणार
advertisement
दरम्यान, पलाशने स्मृतीला लग्नासाठी विचारलं आणि स्मृतीने देखील हा म्हटलं. त्यानंतर दोघांचा आनंद गगनात मावेना झाला होता. स्मृती मानधना आता इंदौरची सून होणार आहे. आता स्मृतीच्या लग्नासाठी बीसीसीआय अधिकाऱ्यांसह अख्खी टीम इंडिया देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 21, 2025 2:02 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
जिथं वर्ल्ड कप जिंकला तिथंच पलाशने स्मृतीला घातली लग्नाची मागणी, Video समोर! इंदौरचं वऱ्हाड सांगलीत दाखल


