TRENDING:

WhatsApp Call नेही ट्रॅक होऊ शकतं तुमचं लोकेशन! लगेच करा ही सेटिंग

Last Updated:

व्हॉट्सॲप कॉलद्वारेही तुमचे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही तुमच्या फोनचे लोकेशन बंद केले तरी हॅकर्स ते ट्रॅक करू शकतात. यासाठी तुम्हाला ॲपमध्ये एक छोटी सेटिंग करावी लागेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. भारतात याचे 55 कोटींहून अधिक यूझर्स आहेत. व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवण्यासोबतच ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगही करता येतं. मात्र, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डिजिटल फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येताय. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमचे मित्र आणि नातेवाईकांसोबत फोटो, व्हिडिओ आणि फाइल शेअर करता. कंपनी याला सर्वात सुरक्षित प्लॅटफॉर्म म्हणते, परंतु एक चूक तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते.
व्हॉट्सअॅप
व्हॉट्सअॅप
advertisement

व्हॉट्सॲपवर कॉल करताना तुमचे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते. मात्र, तुम्ही तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग करून लोकेशन ट्रॅकिंगपासून स्वतःला रोखू शकता. व्हॉट्सॲप कॉलिंग करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. कॉल दरम्यान, व्हॉट्सॲपद्वारे एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसशी कनेक्ट होऊ शकतो. अनेक वेळा घोटाळे करणारे तुम्हाला WhatsApp द्वारे ऑडिओ व्हिडिओ कॉल करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही हे फीचर वापरून लोकेशन ट्रॅकिंग थांबवू शकता.

advertisement

लवकरच लॉन्च होणार Realme 14X; फीचर्स लीक, पाहा किंमत किती

IP ॲड्रेस इन-कॉल फीचर

मेटाच्या या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये प्रोटेक्ट IP ॲड्रेस इन कॉल्स नावाचे फीचर देण्यात आले आहे. हे फीचर इनेबल केल्यानंतर, कॉल दरम्यान तुमचे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकत नाही. हे फीचर WhatsApp कम्युनिकेशनसाठी अतिरिक्त सिक्योरिटी लेयर प्रदान करते.

advertisement

WhatsApp मध्ये ऑन करा या 4 सेटिंग्स, अ‍ॅप नेहमी राहील सिक्युअर

असे इनेबल करा

- हे फीचर सक्षम करण्यासाठी, प्रथम तुमच्या फोनमध्ये WhatsApp लाँच करा.

- आता होम पेजच्या टॉपवरील तीन बिंदूंवर टॅप करा.

- यानंतर व्हॉट्सॲपच्या सेटिंग्ज आणि प्रायव्हसी फीचरवर जा.

- येथे तुम्हाला Advanced चा ऑप्शन मिळेल. त्यावर टॅप करा आणि पुढे जा.

advertisement

- पुढील विंडोमध्ये तुम्हाला प्रोटेक्ट आयपी ॲड्रेस इन-कॉल्सचा ऑप्शन मिळेल. हे फीचर चालू करा.

- असे केल्याने, कॉल दरम्यान तुमचा IP अॅड्रेस रिसीव्हरपासून लपवला जाईल. यामुळे लोकेशन ट्रॅकिंग थांबणार आहे.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp Call नेही ट्रॅक होऊ शकतं तुमचं लोकेशन! लगेच करा ही सेटिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल