लवकरच लॉन्च होणार Realme 14X; फीचर्स लीक, पाहा किंमत किती

Last Updated:

Realme चा नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन काही दिवसात लॉन्च होऊ शकतो. डिव्हाइसशी संबंधित अनेक माहिती लीक झाली आहे.

रियलमी
रियलमी
Realme New Smartphone: नवीन “Realme 14X” लवकरच भारतात लॉन्च होईल. आत्तापर्यंत तो 3C सह अनेक सर्टिफिकेशन वेबसाइटवर पाहिला गेला आहे. तो 18 डिसेंबरला भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. स्मार्टफोनचे तीन कलर व्हेरियंट बाजारात उपलब्ध होऊ शकतात.
स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स लीक झाले आहेत. हे बाजारात Realme 12X ला सक्सीड करू शकतात. Realme 14X क्रिस्टल ब्लॅक, गोल्डन ग्लो आणि ज्वेल रेड कलरमध्ये बाजारात उपलब्ध असू शकतो. सुरुवातीची किंमत सुमारे 15 हजार रुपये असेल. कंपनीने हँडसेटबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
advertisement
स्टोरेज आणि बॅटरी पॅक (Realme 14X Leaks)
प्रोसेसरबाबत कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. लीकनुसार, फोनचे तीन स्टोरेज व्हेरिएंट आढळू शकतात - 6 GB + 128 GB, 8 GB + 128 GB आणि 8 GB + 256 GB. 6000mAh बॅटरीसह 45W चार्जिंग मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
डिस्प्ले, कॅमेरा आणि इतर फीचर्स
Realme 14x 6.67 इंच फुल एचडी प्लस LCD स्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 9000 nits पीक ब्राइटनेससह लॉन्च केला जाऊ शकतो. मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा 2 मेगापिक्सेल सेकेंडरी कॅमेरासह दिसू शकतो. समोर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. याला IP69 रेटिंग मिळू शकते, जे डिव्हाइसला पाणी आणि घाण पासून प्रोटेक्ट करेल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
लवकरच लॉन्च होणार Realme 14X; फीचर्स लीक, पाहा किंमत किती
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement