WhatsApp मध्ये ऑन करा या 4 सेटिंग्स, अॅप नेहमी राहील सिक्युअर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
WhatsApp Settings: व्हॉट्सॲप यूझर्सची प्रायव्हसी मजबूत करण्यासाठी अनेक फीचर्स प्रदान करते. पण, त्यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही. आम्ही तुम्हाला अशा चार सेटिंग्जबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची प्रायव्हसी मजबूत होण्यास मदत होईल.
WhatsApp Privacy: व्हॉट्सॲप हे अतिशय उपयुक्त ॲप आहे. जगभरात करोडो लोक त्याचा वापर करतात. WhatsApp पर्सनल तसेच प्रोफेशनल कारणांसाठी वापरले जाते. व्हॉट्सॲपवर लोकांचा पर्सनल डेटा आहे, त्यामुळे प्रायव्हसीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यूझर्सची प्रायव्हसी मजबूत करण्यासाठी कंपनी अनेक फीचर प्रदान करते. पण, त्यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही. आम्ही तुम्हाला अशा चार सेटिंग्जबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची प्रायव्हसी मजबूत होण्यास मदत होईल.
या सेटिंग्ज कुठे मिळतील
या सेटिंग्जमध्ये अॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला WhatsApp उघडावे लागेल. यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. येथे तुम्ही प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करा. मग एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला प्रायव्हसी चेकअपचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा. इथेच तुम्हाला चारही ऑप्शंस मिळतील.
advertisement
पहिला ऑप्शन
पहिल्या ऑप्शनमध्ये तुमच्याशी कोण संपर्क साधू शकतो हे ठरवण्याची सुविधा तुम्हाला मिळेल. तुम्हाला ग्रुपमध्ये कोण अॅड करु शकतो हे तुम्ही ठरवू सकता. तुम्ही अनोळखी लोकांकडून येणारे कॉल सायलेंट करू शकता. याशिवाय, जर तुम्हाला एखाद्याला ब्लॉक करायचे असेल तर तुम्ही ते येथून देखील करू शकता.
दुसरा ऑप्शन
दुसऱ्या ऑप्शनमध्ये, तुम्हाला तुमची पर्सनल माहिती नियंत्रित करण्याची सुविधा मिळते. तुमचे प्रोफाइल फोटो कोण पाहू शकते हे तुम्ही ठरवू शकाल. तुमचं लास्ट सीन आणि तुमचं ऑनलाइन स्टेटस कोण पाहील हे तुम्ही ठरवू शकता. सोबतच तुम्ही रीड रिसीप्टही कंट्रोल करु शकता.
advertisement
तिसरा ऑप्शन
तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला डिफॉल्ट मेसेज टायमर सेट करण्याची सुविधा मिळते. याशिवाय तुम्हाला एंड-टू-एंड एनक्रिप्टेड बॅकअप नियंत्रित करण्याची सुविधा देखील मिळते.
चौथा ऑप्शन
चौथा ऑप्शन तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट अधिक सुरक्षित बनवण्याची परवानगी देतो. यामध्ये तुम्ही WhatsApp उघडण्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक सेट करू शकता. यासोबतच तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन देखील सेट करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2024 12:16 PM IST