YouTube चं नवं पॅरेंटल कंट्रोल फीचर का खास?
ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने हे फीचर खास शॉर्ट व्हिडिओवर कंट्रोल करण्यासाठी लॉन्च केले आहे. या फीचरच्या मदतीने मुलांचे आई-वडील ठरवू शकतील की, त्यांचा मुलगा रोज YouTube शॉर्ट्स किती वेळ पाहील. या नवीन कंट्रोल फीचरच्या मदतीने मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित केला जाऊ शकतो. ज्यामुळे त्यांना मोबाईलपासून थोडं दूर राहण्यात मदत मिळेल. यामध्ये पॅरेंट्सला वेगवेगळे फीचर्स मिळतील. जे ते वेळेसह आपल्या मुलांच्या YouTube वर लावू शकतात.
advertisement
Android यूझर्स धोक्यात! लिंकवर क्लिक न करताही हॅक होईल फोन, लगेच करा हे काम
शॉर्ट्ससाठी वेगळी वेळ मर्यादा निश्चित करण्याचा पर्याय
या फीचरचे सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे पालक संपूर्ण YouTube साठी वेळ लिमिट सेट करू शकतात. फक्त शॉर्ट्ससाठी वेळ लिमिट सेट करू शकतात. यामुळे मुलांना हवे असल्यास शैक्षणिक व्हिडिओ पाहता येतील, परंतु ते शॉर्ट्सवर जास्त वेळ घालवू शकणार नाहीत. अनेक पालक त्यांच्या मुलांसाठी कठोर कंट्रोल मागत आहेत. आता, या फीचरसह, YouTube ने तासंतास शॉर्ट्स स्क्रोल करण्याच्या सवयीवर ब्रेक लावला आहे.
पूर्णपणे रोखण्याचाही पर्याय
आता आई-वडिलांजवळ हा पर्याय असेल की, ते शॉर्ट्स पूर्णपणे बंद करु शकतील. याचा अर्थ असा आहे की, ठरवलेल्या वेळेपर्यंत तुमचं मुल एक शॉर्ट व्हिडिओही पाहू शकणार नाही. परिक्षेच्या काळात किंवा अभ्यासाच्या वेळेत हे फीचर खुप फायदेशीर ठरु शकते.
Instagramची ही सेटिंग ऑन केल्यास लगेच व्हायरल होतील Reels! पाहा डिटेल्स
वेळेची मर्यादा दररोज बदलता येते. पालकांना शाळेच्या दिवसात कमी टाइम लिमिट आणि सुट्ट्या किंवा प्रवासादरम्यान जास्त टाइम लिमिट सेट करण्याची परवानगी देण्यासाठी YouTube ने हे फीचर डिझाइन केले आहे. यामुळे मुलांना पूर्णपणे प्रतिबंधित करण्याऐवजी संतुलन राखणे सोपे होईल.
वेळेचं रिमाइंडर मिळेल
मुलांना वेळेवल व्हिडिओ बंद करण्यासाठी अॅपमध्ये रिमाइंडरही मिळेल. वेळ पूर्ण होताच मुलांना ब्रेक घेण्याचा किंवा झोपण्याचा संकेत दिला जाईल. ज्यामुळे रात्री उशीरापर्यंत मोबाईल पाहण्याच्या सवयीवरही लगाम लावता येईल.
वयानुसार कंटेंटवर जोर
युट्यूब म्हणते की ते मुलांसाठी आणि प्रौढांसाठी असा कंटेंट प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते जी केवळ मनोरंजकच नाही तर त्यांना शिकण्यास देखील मदत करते. यामुळे मुलांना त्यांचा वेळ योग्य दिशेने वापरण्यास मदत होईल.
पालकांसाठी सोप्या सेटिंग्ज
नवीन अपडेटमुळे मुलांचे अकाउंट व्यवस्थापित करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. पालक मोबाइल अॅपमध्ये पर्सनल मुलांचे खाते पाहू आणि मॅनेज करू शकतात. हे नवीन YouTube फीचर अशा पालकांसाठी आदर्श आहे ज्यांना त्यांच्या मुलांनी त्यांचे मोबाइल फोन योग्यरित्या वापरावेत असे वाटते, परंतु त्याचे व्यसन न लागता.
