22 जानेवारीला काय घडलं होते?
मिळालेल्या माहितीनुसार,22 जानेवारी रोजी संध्याकाळी मुंब्रा येथील खादिमा मशीन रोडवर डीसीबी बँकेजवळ ही घटना घडली. फरजाना मन्सुरी (वय 23) या आपल्या दोन मुलींसह रस्ता ओलांडत असताना बुर्का परिधान केलेल्या एका महिलेने बाळाला हातात घेऊन रस्ता ओलांडते असे सांगितले. मात्र काही क्षणातच ती महिला बाळासह गर्दीतून गायब झाली.
advertisement
रिक्षावरचा तो एक शब्द आणि 1600 सीसीटीव्ही
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित महिला आई असा शब्द लिहिलेल्या ऑटोरिक्षातून पळून गेल्याचे दिसून आले. पोलिस आयुक्त अशुतोष डुंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली. तब्बल 1,600 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.
अनेक तपास आणि सीसीटीव्हीच्या आधारे नासरीन शेख हिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने बाळ मोहम्मद मुजीब गुलाब (वय 31) आणि त्याची पत्नी खैरुन्निसा (वय 30) यांच्याकडे दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी बाळाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले असून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
