मोखाडा: पालघर जिल्ह्यातील मोखाड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकतंच बाळाला जन्म दिलेल्याा मातेसह नवजात बाळाला रुग्णवाहिकेनं अर्ध्या रस्त्यात सोडून दिल्याची संताापजनक घटना पालघर जिल्ह्याातील मोख्याडात घडली आहे. रुग्णवाहिकेनं अर्ध्या रस्त्यात सोडून दिल्यामुळे प्रसुत महिलेला नवजात बालकासोबत 2 किलोमीटर पायपीट करावी लागली. या घटनेमुळे गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मोखाडा तालुक्यातील आमला गावात ही घटना घडली आहे. प्रसूत महिलेला अर्धवट रस्त्यात सोडून रुग्णवाहिका गेल्याने प्रसूत महिलेच्या कुटुंबाची बाळाला घेऊन दोन किलोमीटर पायपीट करावी लागली.
प्रसूत महिला सविता बारात (सासरचे नाव सविता बांबरे) हिला बुधवार दिनांक १९ नोव्हेंबरला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर तिला काही कारणास्तव जव्हार कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आलं होतं. कुटीर रुग्णालयात तिची प्रसुती सुखरूप झाली. रविवार 23 नोव्हेंबरला तिला रुग्णवाहिका देऊन घरी पाठविण्यात आलं होतं.
मात्र रुग्णवाहिका चालकाने बाळाला आणि आईला गावापासून दोन किलोमीटर अंतरावर रस्त्यावर उतरवून रुग्णवाहिका निघून गेली. प्रसूत महिला सविता बारात हिच्या सोबत आई आणि सासूबाई होत्या.त्यामुळे बाळाला आणि प्रसूत महिलेला दोन किलोमीटर पायपीट करावी लागली.
सगळे जण दोन किलोमिटर पायपीट करत घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार कुटुंबीयांना सांगितलाा. या सर्व घटनेचा त्याच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. नुकतंच बाळाला जन्म दिलेली मातेला दोन किलोमिटर पायपीट करावी लागली, जर या महिलेला काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं? असा प्रश्न त्यांच्या कुटुंबांनी उपस्थितीत केला आहे.
या घटनेमुळे मोखाड्यातील आरोग्य व्यवस्थेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. रुग्णवाहिका चालकाने बाळ आणि महिलेला अर्ध्या रस्त्यात का उतरवलं, त्याचं कारण काय होतं, असे अनेक सवाल उपस्थितीत झाले आहे. या घटनेबद्दल गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
