57 वर्षीय आरोपी अधिकारी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळात सहाय्यक इस्टेट अधिकारी म्हणून काम करत होता. लाच गोळा करण्यासाठी त्याच्या सहकाऱ्याचा मध्यस्थी म्हणून वापर करण्यात आल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. एसीबीच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार हा एक कंत्राटदार होता, जो सोसायटी रजिस्ट्रेशन आणि मालमत्ता हस्तांतरणाचे काम करतो. त्याने 11 जून 2025 रोजी नवी मुंबईतील सानपाडा येथील फ्लॅटच्या हस्तांतरणासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. तक्रारदाराने पॉवर ऑफ ॲटर्नीकडे (Power of Attorney- POA) सर्व वैध आणि आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. तरीही, कोणतीही माहिती न देता त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवण्यात आल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे.
advertisement
त्यानंतर कंत्राटदाराने 22 जानेवारी 2026 रोजी एसीबीकडे संपर्क साधला. तेव्हा एसीबीकडे तक्रार केली की, सिडको अधिकाऱ्याने फ्लॅट हस्तांतरणाचे डॉक्युमेंट मंजुर करण्यासाठी 4 लाख रुपयांची मागणी केली होती. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी, इन्वेस्टिगेशनसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, हे पैसे अधिकाऱ्याने मागितले नसून त्याने त्याच्या एका कर्मचाऱ्यामार्फत दोन लाख रुपयांची लाच मागितली आहे. सहकाऱ्यामार्फत मागत असल्यामुळे रक्कम कमी करण्यात आली होती. एसीबीने बुधवारी सापळा रचत नेरुळ रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये लाच स्वीकारताना आधी सहकाऱ्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर सिडको अधिकाऱ्याला एसीबीकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पीटीआयकडून देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यासोबतच त्याच्या सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
