पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे सासरे सायंकाळच्या सुमारास घरी असताना शेजारी राहणाऱ्या किशन कुमरखानिया याने रमेश चेखलिया यांना कारण नसताना मारहाण केली. या घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण झाले होते.
शेजारच्या वादातून घर गाठून केली मारहाण
या मारहाणीबाबत जाब विचारण्यासाठी तक्रारदार, त्यांची पत्नी, सासरे आणि मेहुणे असे सर्वजण रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास आरोपींच्या घरी गेले. मात्र तेथे पोहोचताच वाद अधिकच चिघळला. आरोपी अनिल कुमरखानिया याने तक्रारदार यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ केली. यानंतर आरोपींनी एकत्र येत तक्रारदार कुटुंबावर हल्ला केला.
advertisement
या हल्ल्यात कुटुंबातील काही सदस्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
सध्या पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. शेजारील वादातून हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
