ठाण्यात सायबर फसवणुकीची नवी पद्धत
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील एका परिसरात एक तरुणीच्या तिच्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. तिने साधारण 12 ऑक्टोबर रोजी एका कंपनीकडून ऑनलाइन ड्रेस ऑर्डर केला होता. मात्र, ठरलेल्या वेळेत डिलिव्हरी न मिळाल्याने तिने गुगलवर त्या कंपनीचा संपर्क क्रमांक शोधला. त्यानंतर तिने कॉल केला असता त्याने तरुणीला स्वतःला कंपनीचा डिलिव्हरी एग्जिक्युटिव्ह सांगत व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल केला.
advertisement
गुगलवरील खोट्या नंबरवर कॉल केला आणि झाली लाखोंची फसवणूक
पुढे समस्या सोडवण्यासाठी त्याने तरुणीनेकडून ओटीपीची घेतला. मात्र, तरुणी त्याच्याशी बोलत असताना तरुणीच्या वडिलांना त्यांच्या क्रेडिट कार्डची लिमिट जरा बदललेली दिसली. ज्यात दीड लाखांची लिमिट काही क्षणांतच थेट 15 लाखांपर्यंत वाढलेली दिसून आली. हे लक्षात येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली.फसवणुकीची जाणीव होताच त्यांनी तत्काळ बँकेशी संपर्क केला आणि कार्ड ब्लॉक केलं. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकारामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालं की गुगलवरून कस्टमर केअर नंबर शोधणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. सायबर तज्ञांच्या मते, अधिकृत वेबसाइट किंवा अॅपशिवाय कुठेही संपर्क क्रमांक शोधणं टाळावं अन्यथा अशाप्रकारे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.
