मुलींमध्ये लहानपणापासूनच कलेची देणगी असते परंतु या कलेचा कुठेही प्रदर्शन करून होत नाही. BAF मध्ये शिक्षण पूर्ण करत असलेल्या या विद्यार्थिनीने शाळा ते कॉलेजपर्यंत आपल्या कलेतून खूप प्राईज मिळवले. परंतु हिच कला योग्य ठिकाणी वापरली आणि आज अवघ्या 23 वर्षात स्वतःच्या पायावर उभी राहिली. कुठेही कोर्स केला नसताना आपल्या कलेतून तिने स्वतःची ओळख निर्माण केलेली, ग्रामीण भागात राहत असल्याने तिच्या या कलेला जास्त प्रोत्साहन देणारे कोणी नव्हते.
advertisement
म्हणून तिने तिच्या मैत्रिणीकडे विषय घेऊन एक प्रोफेशन मेहंदी आर्टिस्ट जॉइन करण्याचा निर्णय घेतला आणि प्रोफेशन मेहंदी आर्टिस्ट बनली. मानसीने 2023 साली क्लासेस घेण्याचे ठरवले आणि 8 मुलींपासून क्लास सुरू केला या दोन वर्षात तिच्या 3 बॅच टिटवाळा, गोवेली आणि कल्याण या ठिकाणी सुरू केल्या. त्यातच ती स्वतः मेहंदी कोन बनवण्यापासून सर्वच हँडल करते. कमी वयात गाठलेल शिखर आज तीच भविष्य उजळवून गेलं. ज्या वयात मुलं- मुली करिअरपासून भरकटतात त्याच वयात मानसीने छोट्या व्यवसायाची सुरुवात केली.
आज क्लासेस तसेच मेहंदी ऑर्डर आणि मेहंदी कोन बनवण्यातून लाखो रूपये कमावते. म्हणून मानसीने सांगितलं व्यवसाय छोटा मोठा नसतो टपरी टाकून पण लाख रुपये कमवू शकता. आणि मोठ मोठे शॉप टाकून पण 10 हजार कमवू शकता. त्यामुळे योग्य वेळीच आपल्या कलागुणांना वाव द्या आणि स्वतःच्या व्यवसायातच स्वतः मालक बना. मग त्यातून मिळणारा नफा आणि समाधान हे नक्कीच अनुभवाला मिळतो. आज ग्रामीण भागात राहणारी मानसी मुंबई सारख्या शहरात जाऊन ऑर्डर हॅण्डल करते. मानसीच्या या कलेतून अनेकांचं मन जिंकले आहे.