पतीच्या कृत्याने संपूर्ण परिसर हादरला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. आरोपी आर. पी. मुन्नवर अहमद हा किरकोळ कारणावरून पत्नीला वारंवार शिवीगाळ करत असे. तसेच तो तिला धमकावत शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.
घरगुती वादातून आरोपी पतीने पत्नीला मारहाण केल्याचेही समोर आले आहे. सातत्याने होणाऱ्या छळामुळे महिलेचे मानसिक स्वास्थ्य बिघडत होते. याच काळात आरोपीने पत्नीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने तिच्या परवानगीशिवाय घेत अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
advertisement
दीर्घकाळ चाललेल्या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने आचोळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पतीविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
