माध्यमांसोबत संवाद साधताना शिवकुमार माळी म्हणाले की, "पिंकी गेल्या 8 वर्षांपासून एअर होस्टेस म्हणून काम करते. करियरच्या सुरूवातीला तिने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन वर्षे काम केले. त्यानंतर तिचं प्रमोशन झालं. त्यानंतर ती कलिना- सांताक्रूझच्या विमानतळावर खासगी चार्टर्ड विमानांमध्ये काम करू लागली. चार्टड विमानामध्ये, काम करायला लागल्यापासून तिने तब्बल चार वेळा अजित पवारांसोबत चार्टड फ्लाईटमधून प्रवास केला आहे. यासोबतच राज्यातल्या इतरत्र प्रमुख नेत्यांसोबतही तिने प्रवास केला आहे. इतक्या कमी वयात स्व: कतृत्वावर स्वत:ची एक वेगळी प्रतिमा तयार केलेली आहे. तिच्या या प्रतिमेचे फक्त कुटुंबीयच नाही तर, नातेवाईक आणि शेजारील लोकंही कौतुक करतात.
advertisement
विमान दुर्घटनेच्या आदल्या दिवशी पिंकीने वडीलांसोबत फोनवरून संवाद साधला होता. ती वडीलांना म्हणाली होती, "बाबा, मी अजित पवारांसोबत बारामतीला जाणार आहे आणि त्यांना सोडून पुढे मी नांदेडला जाणार आहे. विमानात बसल्यानंतर अजित पवारांसोबत तसं तुमचं बोलणं करून देईन, असं ती आम्हाला म्हणाली होती. बुधवारी सकाळी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेची आम्ही बातमी पाहिली आणि आमचा इकडे जीव कासावीस झाला. जेव्हा विमान अपघातामध्ये पिंकींचं सुद्धा नाव आलं, त्यावेळी तिथेच सर्व काही आमचं संपलं," अशी प्रतिक्रिया तिच्या वडीलांनी दिली. दरम्यान, अजितदादा आणि पिंकी दोघांनीही आपला शब्द पाळला नाही, असे दु:ख पिंकीचे वडील शिवकुमार माळी यांनी व्यक्त केले.
पिंकी कामातही फार उत्कृष्ट होती. अलीकडेच तिला प्रमोशन मिळालं होतं. तिच्या जाण्याने फक्त तिच्या कुटुंबाचेच नाही तर, उत्तर प्रदेशातल्या जौनपूर जिल्ह्यातल्या भैंसा गावकऱ्यांचेही फार मोठे नुकसान झाले.
