TRENDING:

Leopard Attack : पुण्यानंतर भाईंदरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; भरवस्तीत एकावर हल्ला, परिसरात प्रचंड दहशत

Last Updated:

Leopard Spotted In Bhayander East : भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड परिसरात भरवस्तीत बिबट्या शिरल्याने दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून तो सध्या एका इमारतीत अडकलेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय देसाई
News18
News18
advertisement

भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड परिसरात आज पहाटे घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. भर नागरी वसाहतीमध्ये अचानक बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळच्या सुमारास रहिवासी आपापल्या कामासाठी घराबाहेर पडत असतानाच बिबट्या रस्त्यावर दिसून आला आणि क्षणातच परिसरात एकच गोंधळ उडाला.

परिसरात येताच नागरिकांवर हल्ला

advertisement

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या बिबट्याने आतापर्यंत तिघांवर हल्ला केला असून तिघेही जखमी झाले आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश असून बिबट्याने थेट इमारतीमध्ये शिरून तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी मुलीला सुरक्षितपणे बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान बिबट्या सध्या एका इमारतीमध्येच अडकून असून त्याला बाहेर पडू न देता रहिवासी आणि महापालिकेचे अग्निशमन दल प्रयत्न करत आहेत. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मिरचीचा ठेचा खाऊन कंटाळा आलाय? ‎तुरीच्या दाण्यांपासून बनवा खास रेसिपी,खाल आवडीने
सर्व पहा

या घटनेमुळे तलाव रोड परिसरात एकच दहशत पसरली असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट आहे. वनविभागाला तातडीने घटना स्थळी बोलावण्याच आले असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणि तज्ज्ञ पथक घटनास्थळी दाखल होण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक धनेश पाटील यांनीही घटनास्थळी भेट देत नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन केले आहे

मराठी बातम्या/ठाणे/
Leopard Attack : पुण्यानंतर भाईंदरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; भरवस्तीत एकावर हल्ला, परिसरात प्रचंड दहशत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल