मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये राहणारे हरी मेघराज नागदेव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांना मुलांकडून आधार आणि आपुलकीची अपेक्षा असताना प्रत्यक्षात त्यांच्यासोबत घडलेल्या या घटनेनी सर्वजण हादरवून गेले आहे. नागदेव यांचा मुलगा राम नागदेव हा गेली अनेक वर्षे स्पेनमधील शहरात वास्तव्यास आहे.
मात्र 2 ऑक्टोबर रोजी तो अचानक उल्हासनगरमधील त्याच्या वडिलांकडे आला आणि येताच त्यांनी वडिलांकडे मालमत्तेतील हिस्सा देण्याचा दबाव टाकू लागला.पण वडिलांनी त्याला वेळ देण्यास सांगितले त्यामुळे त्याला प्रचंड राग आला आणि त्याने वडिलांना मारहाण केली.
advertisement
या घटनेनंतर नागदेव कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. विठ्ठलवाडी पोलिसांनी राम नागदेव याच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 9:12 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Crime News : 'हिस्सा दे नाहीतर…' मुलाच्या धमकीनंतर वडिलांसोबत जे घडलं ते पाहून उल्हासनगर हादरलं; नेमकं काय घडलं?
