राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय पालकांसाठी दिलासा
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच मानसिक आधार आणि योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. यामध्ये विशेषतहा इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्रे आयोजित केली जाणार असून परीक्षा, करिअर, आत्मविश्वास, ताणतणाव आणि भावनिक समस्या यावर मार्गदर्शन दिले जाईल. यासोबतच इयत्ता 1 ली ते 12 वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वयाप्रमाणे समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
advertisement
शाळेतील वातावरण अधिक सुरक्षित आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांवर होणारी शारीरिक शिक्षा, मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक किंवा दबाव टाकणाऱ्या कोणत्याही कृतींवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारच्या वर्तनावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
याशिवाय शिक्षकांसाठीही समुपदेशनाचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीची ओळख कशी करावी, तणावग्रस्त विद्यार्थ्यांना कसे हाताळावे आणि सकारात्मक वातावरण कसे निर्माण करावे याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले जाईल.
