
भाजीपाला शेती ही जलद उत्पन्न देणारी आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याचा सर्वात सोपा मार्ग मानला जातो. मात्र नियोजन शिवाय केलेली शेती अनेकदा तोट्यात जाते. यामुळे अलीकडच्या काळात ‘स्मार्ट प्लॅनिंग’ हा शब्द शेतीत विशेष महत्वाचा ठरत आहे. माती, हवामान, पाणी उपलब्धता, बाजारातील मागणी आणि पीक कालावधी यांचा अभ्यास करून केलेले शेती नियोजन अधिक फायदेशीर असल्याचे कृषी अभ्यासक लहू चव्हाण यांचे मत आहे. कृषी विभागाकडूनही भाजीपाला शेतीत वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.