छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 'महादेव वनउद्यान' हे एक अद्वितीय, अध्यात्माशी निसर्गाची सांगड घालणारे ठिकाण ठरत आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या पायथ्याशी हे वनउद्यान वनविभागातर्फे उभारण्यात आले असून, ते शेकडो भक्तांसाठी एक निसर्गसंपन्न ठिकाण ठरत आहे. 12 एकरातील या वनउद्यानात सुमारे 47 प्रजातींचे वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली आहे. तसेच महादेवाच्या 3 पिंड असून पंचमुखी आणि एक मुखी शिल्प आहे.