
छत्रपती संभाजीनगर : चिकन किंवा मटनचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्यापैकी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. आपल्यापैकी अनेकांना नॉनव्हेज खायला खूप आवडतं. पण हे नॉनव्हेज खाण्याची कुठली योग्य वेळ आहे? त्यासाठी तुम्ही कुठल्या वेळेत खाल्ल्यानंतर ते तुम्हाला पचायला सोपं जातं? कुठल्या वयोगटातील व्यक्तीने किती नॉनव्हेज खावं? याविषयीचं छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 19:51 ISTनाशिकमधून राज ठाकरेंचं भाषण चालू आहे. त्यात त्यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. त्यात ते म्हणाले, "कल्याण डोंबिवलीतील उमेदवारांना १५ कोटींची ऑफर दिली गेली होती."
Last Updated: Jan 09, 2026, 20:19 ISTविस्मरणात गेलेले शब्द आता पुन्हा राजकीय लोकं वापरताना दिसत आहे. ते शब्द जिवंत होत आहेत. ते शब्द इतर कोणताही पक्ष नाही तर शिवसेनेचा मित्र पक्ष भाजपच वापरत आहेत. त्यांनी प्रतिक्षानगरमध्ये 'पन्नास खोके एकदम ओके' या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे हा शिवसेना भाजपात वाद पेटला आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 20:11 ISTउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेतील गेल्या महिनाभरापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. येथील घडामोडींची चर्चा राज्यात नाही तर दिल्लीत देखील झाली. अंबरनाथमध्ये भाजपने एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी थेट काँग्रेसशी युती केली . ही विचित्र युती देशभरात चर्चेचा विषय ठरली. यानंतर काँग्रेसनं त्यांच्या 12 नगरसेवकांचं निलंबन केलं. या नगरसेवकांना भाजपनं आपल्या पक्षात घेतलं. सत्ता स्थापनेचा दावा केला. पण आता श्रीकांत शिंदेंनी मोठी राजकीय खेळी करत भाजपला धक्का दिला आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 19:34 ISTबीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे. एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे. यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे.विरोधकांनी शिंदे गटाला घेरताना आता कुठं हिंदुत्व असा सवाल केला आहे. शिवसेना शिंदे गटाने एमआयएमसोबत केलेली युती ही राज्यात चर्चेची विषय ठरली आहे. तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Last Updated: Jan 09, 2026, 19:25 IST