वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कराडचा मुक्काम आता 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कराडची 10 दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली होती, मात्र न्यायालयानं 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्त्या महिला वकील हेमा यांनी निषेध व्यक्त केला. दिवसाढवळ्या माणसांना मारलं जात असून, मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये यावं न लक्ष द्यावं असं त्या म्हणाल्या.