संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी दोन प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुण्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे. हत्या प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्यातील दोन जण असण्याची शक्यता आहे. यावेळी मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वक्तव्य केलं हत्येमागे संघटित गुन्हेगारी दिसत असल्याचं त्यांनी म्हंटल, सर्व आरोपींवर मोक्का लावायला पाहिजे, फरार आरोपीला लवकरच ताब्यात घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हत्येची घटना म्हणजे समाजातील विकृती असल्याचं त्यांनी म्हंटल.