संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामधून संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आले. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. स्व. सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी त्यांची हैवानियत दाखवत संतोष देशमुख यांच्या मृतदेहासमोर जल्लोष केला. त्याचे फोटो व्हिडिओ बाहेर आले. माणुसकीला काळीमा फासणारी आणि बघता क्षणी डोळ्यात अश्रू आणणारी ही घटना आहे. काल आरोपींच्या या कृत्याचे काही फोटो समोर आले आणि अख्खा महाराष्ट्र हादरून गेलाय. आज मस्साजोग येथे जरांगे यांनी स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली या दरम्यान धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी जरांगेना मिठी मारत हंबरडा फोडला जितक्या क्रूरतेने त्यांचा भावाची हत्या करण्यात आली हे सर्व या फोटोच्या माध्यमातून समोर आले.