पुण्यातील प्रचंड गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 26 वर्षीय पीडित तरुणी मंगळवारी पहाटे स्वारगेटहून फलटणला जाण्यासाठी आली होती. यावेळी ती एकटी असल्याचा फायदा काही जणांनी घेतला. नराधमांनी शिवशाही बसमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. पहाटे साडे पाचच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. दत्तात्रय रामदास गाडे असं फरार आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या मागावर पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहे.