पुण्यातील प्रचंड गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पुण्यात एकचं खळबळ उडाली. पुण्यात काम करणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीवर पहाटे साडे पाचच्या सुमारास घृणास्पद घटना घडली असून नराधमांनी शिवशाही बसमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणातील CCTV फुटेज आता समोर आलं आहे.