संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कराडवर 302 अंतर्गत मकोका लावला असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. तर दुसरीकडे कराडवर मकोका लागल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांत कराड समर्थकांनी परळी बंद केली. अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळत आंदोलन केलं तर जरांगे,धस आणि क्षीरसागरांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.परळीमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जोडे मारो आंदोलन केलं.. आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्या प्रतिमेला जोडे मारून कराड समर्थकांनी निषेध नोंदवला.वाल्मिक कराडला कोर्टात हजर केल्यानंतर बीडमध्ये वातावरण चांगलंच तापलं. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळी बीड राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून निषेध व्यक्त केला.