
धाराशिवमधील कळंब-लातूर रोडवर गंभीर अपघात झाला आहे.ऊसतोड मजूर मालकाकडून पैसे घेऊन कळंबच्या आठवड्याच्या बाजाराला आले होते.एकूण १३ मजूर बसची वाट पाहत थांबले होते.तेव्हा लातूरसाईड कडून येणाऱ्या कारने 7 जणांना उडवले. त्यातील 4 मजूर हे गंभीर जखमी झाले आहेत.वाहनचालक हा पसार झाला आहे. आदीवासी पारधी समाजातील हे मजूर होते. नातेवाईक मोठ्या प्रमाणावर या घटनेचा आक्रोश करत आहे.पोलिस त्याची पुढील चौकशी करत आहेत.