धाराशिव : महाराष्ट्रात अनेकजण शुद्ध शाकाहारी असल्याचं आपल्याला माहितीच असेल. पण एखादं आख्खं गावच शुद्ध शाकाहारी आहे, असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. पण महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात असं एक गाव आहे. जिथल्या चुलींवर कधीच मटण शिजलं नाही. तसेच गावातील कुणीही मांसाहार करत नाही. याच भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी या गावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत