
Bollywood Song : 'हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातील 'फिर भी तुमको चाहूँगा' गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. चित्रपटात माधव आणि रिया या दोघांची मैत्री होते. ते दोघं बास्केटबॉल खेळाडू असतात. माधव हा गरीब कुटुंबातील तर रिया ही श्रीमंत कुटुंबातून असते. तो तिच्यावर प्रेम करु लागतो. पण ती त्याच्या प्रेमाला नकार देते. या चित्रपटातील हे गाणे सुप्रसिद्ध गायक अर्जित सिंग आणि शाशा तिरुपती यांनी गायले आहे. तर मिथून यांनी संगीत दिले आहे. चित्रपटात अर्जून कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.