TRENDING:

प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला आवडतं सागरिकाचं हे गाणं, कपल पुन्हा पुन्हा ऐकतात

Marathi Song : 'प्रेमाची गोष्ट' चित्रपट खूपच भावनिक आहे. चित्रपटातील 'ओल्या सांजवेळी' ते गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. हे गाणं स्वप्निल बांदोडकर आणि बेला शेंडे यांनी गायले आहे. चित्रपटातील अतुल कुलकर्णी यांची राम नावाची भूमिका खूपच संवेदनशील आहे.  अभिनेत्री सागरिका घाटगे ही सई नावाच्या भूमिकेत आहे.  घटस्फोटानंतर प्रेमातील विश्वास गमावलेल्या दोन व्यक्तिींच्या भावनांचा प्रवास हा चित्रपट आहे.

Last Updated: December 07, 2025, 17:02 IST
Advertisement

मुंबईत अग्नितांडव, लाकडाच्या गोदामाला भीषण आग, घटनास्थळाचा VIDEO

मुंबईतून पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे.मुंबईच्या नागपाडा येथे लाकडावाला बाजाराला संध्याकाळच्या सुमारास अचानक लाकडाच्या गोडाऊनला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुपधारण केलं. लाकडाचं गोदाम असल्यामुळे आगीचा भडका उडाला. या गोदामाच्या आजूबाजूला मोठी दाटवस्ती असल्याने भीतीचं वातावरण होतं. मात्र, वेळीच अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.

Last Updated: December 06, 2025, 21:56 IST

हरभरा पिकावर मर लागली ! औषध काय? 'या' फवारणीचा डोस द्या ; नाहीतर होईल मोठे नुकसान

कृषी

हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख पिक आहे. सध्या हे पिक रोप अवस्थेत आहे. या पिकावर अनेक ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. यावर नियंत्रण कसे मिळावावे याबाबतची माहिती पाहुयात यावर्षी हरबरा पेरणी थोडी उशिरा झाली असून, शेवटी झालेल्या पावसाच्या ओलीवर पेरणी झाली आहे, काही ठिकाणी पेरणीला उशीर होत आहे, मागील आठवड्यात थंडी कमी असल्याने हरबरा पिकावर त्याचा परिणाम झाला आहे, आता पुन्हा थंडी वाढलेली आहे. पिकाची वाढ जरा कमी झाली आहे, तसेच बऱ्याच ठिकाणी मर रोग व कॉलर रॉट चा प्रादुर्भाव दिसून येत आहे, बीज प्रक्रिया केली असेल तर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही

Last Updated: December 06, 2025, 20:20 IST
Advertisement

"खूप काम करते, मला व्यायामाची काय गरज?" गैरसमजामुळे गृहिणींचा जीव धोक्यात, वेळीच 'ही' योगासनं सुरू करा!

घरातील रोजची कामं करतो म्हणजे वेगळ्या व्यायामाची गरज नाही,' असा अनेक गृहिणींचा गंभीर गैरसमज असतो. मात्र, हा गैरसमज त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. केवळ घरातील कामे करून शरीराला आवश्यक असलेला व्यायाम मिळत नाही. या चुकीच्या समजुतीमुळे गृहिणींचा जीव धोक्यात येतो! वेळीच सदृढ तब्येतीसाठी तुम्ही घरातच कोणती प्रभावी योगासनं सुरू करू शकता, हे लगेच जाणून घ्या!

Last Updated: December 06, 2025, 19:48 IST

पाटलांच्या घरात होतेय बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा, तिसरी पिढी जपतेय परंपरा, कारण आहे खास Video

सोलापूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय घटनेचे शिल्पकार तथा पददलितांचे तारणहार म्हणून लौकिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील अनेक घरांत त्यांची प्रतिमा असून काहीजण रोज त्यांची पूजा देखील करतात. असंच एक घर सोलापुरात असून गेल्या 70 वर्षांपासून हे पाटील कुटुंब देवदेवतांच्या पूजेआधी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करत आलं आहे. यामागे एक खास कारण असून याबाबतच शिवानंद पाटील यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिली आहे.

Last Updated: December 06, 2025, 19:06 IST
Advertisement

मुंबईत 'बिगेस्ट बुक सेल'! 100 पेक्षा अधिक स्टॉल्स अन् 70% पर्यंत सूट; वाचकांना लॉटरी, Video

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 5 आणि 6 डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी परिसरात तसेच छत्रपती शिवाजी पार्कवर 100 पेक्षा अधिक पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी हे स्टॉल लावले असून वर्धा, नागपूर, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांतील व्यापारी आणि वाचकांची मोठी गर्दी दिसत आहे.

Last Updated: December 06, 2025, 18:01 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला आवडतं सागरिकाचं हे गाणं, कपल्स हेडफोन लावून पुन्हा पुन्हा ऐकतात, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल