
Marathi Superhit Song : 'वाय झेड' चित्रपटातील 'ओ काका' हे गाणं आहे. या चित्रपटात एक गजानन नावाचा तरुण आहे. जो खूप हुशार आहे. पण तो जुन्या विचारांचा आहे आणि त्याला एकही गर्लफ्रेंड नाही. त्यामुळे त्याला सगळे लहान मित्र काका म्हणून चिडवत असतात. त्याची कॉलेजचा मैत्रीण आहे, ती त्याची खिल्ली उडवत असते. तर त्याची अंतरा नावाची मॉडर्न विद्यार्थीनी आहे. जी त्याला सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात कसं वागायचं ते शिकवते. तर गज्याचा मित्र त्याला या गोंधळातून बाहेर काढतो. गजानन नव्या बदलांना स्वीकारतो आणि जगायला लागतो. हे गाणं आदर्श शिंदेने गायले आहे. तर गाण्याला संगीत हे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी दिले आहे. हे गाणं क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले आहे. चित्रपटात सागर देशमख, अक्षय टांकसाळे आणि सई ताम्हाणकर यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत.
Last Updated: Dec 16, 2025, 21:05 ISTशिंदेसेनेने थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 नगरसेवकांना सोबत घेत सत्ता स्थापनेचा दावा करत भाजपला मोठा धक्का दिला आहे.अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्षपदी एनसीपीचे उमेदवार सदाशिव पाटील यांची निवड झाली. श्रीकांत शिंदेंच्या या खेळीने भाजप घायाळ झाला आहे.
Last Updated: Jan 12, 2026, 20:03 ISTकालच्या शिवतीर्थावरील सभेची खूपच चर्चा झाली. त्यावरुन सगळीकडे खळबळ उडवली आहे. सभेत लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग केला गेला. त्यात मनसे नेते राज ठाकरेंनी कोणत्याही नेत्यावर नाही तर त्यांनी व्यावसायिक अदानी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे.
Last Updated: Jan 12, 2026, 19:44 ISTनवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.शिवराम पाटील यांच्या पुतण्याने पैसे वाटल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते करत आहेत. हा व्हीडिओ मनसे नेत्यांनी व्हायरल केला आहे.
Last Updated: Jan 12, 2026, 19:01 ISTदेवेंद्र फडणवासांनी पुण्याच्या मुलाखतीमध्ये अजित दादांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "निवडून येता येत नाही तेव्हा काहीही जाहिरनामे काढतो, घोषणा करतात. पुण्यात घोषणा करणार होतो.पुण्यातील महिलांना विमान प्रवास फ्री करणार होतो. अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय.."
Last Updated: Jan 12, 2026, 18:14 ISTभाजपने नाशिकच्या मुकेश शहाणेंची भाजप मधुन हकालपट्टी केली आहे. त्यांना पक्षातून काढल्यावर ते म्हणाले, "माझं काय चुकलं. माझ्यावर कुठले गुन्हेही नाहीत. मी प्रत्येक आंदोलनात सहभागी झालो. मी एकनिष्ठेने राहिलो हिच माझी चुक का, निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळी दिलाय तुम्ही. हेच मला फळ दिलात काय."
Last Updated: Jan 12, 2026, 17:56 IST