
अमरावती: हिवाळ्यामध्ये विदर्भात ओल्या तुरीच्या दाण्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यातीलच एक म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्याचा झुणका. विदर्भातील सर्वजण हा पदार्थ अगदी आवडीने बनवतात. हिरवी मिरची वापरून बनवलेला झणझणीत झुणका भाकरी सोबत अतिशय टेस्टी लागतो. काही वेळा हाच झुणका चटणी म्हणून सुद्धा वापरला जातो. हिवाळा सुरू झाला की, विदर्भात नवनवीन पदार्थाची मेजवानी सुरू होते. त्यापैकी एक असलेला आणि कमीतकमी वेळात तयार होणारा विदर्भ स्टाईल ओल्या तुरीच्या दाण्याचा झुणका कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीतील गृहिणी जया भोंडे यांनी सांगितली आहे.
Last Updated: Jan 01, 2026, 14:07 ISTपुण्यात पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पूजा मोरे यांना अर्ज मागे घ्यावा लागला. तेव्हा त्या ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या, "आजचा दिवस खूप अवघड आहे. मी शेतकऱ्यांसाठी काम करत होते. शेतकऱ्यांच्या वेदना समजल्या कारण मी शेतकऱ्याची मुलगी होते. खूप कमी वयात न्यायालयाची पायरी चढावी लागली. मी पोलीसांच्या लाट्याकाट्या खाल्ल्या. मी नेहमीच महिला आणि शेतकऱ्यांसाठी काम केलं."
Last Updated: Jan 01, 2026, 15:48 ISTहिवाळा स्पेशल तुरीच्या दाण्यांपासून बनवलेल्या अनेक रेसिपी आपण बघितल्या असतील. त्यातीलच आणखी एक रेसिपी आज आपण बघणार आहोत. ती म्हणजे सोले भात आणि कढी. विदर्भातील सर्वात स्पेशल पदार्थ म्हणजे सोले भात. अगदी विक्रीत महागडा पुलाव सुद्धा मागे टाकेल असा चविष्ट आणि दाणेदार सोले भात विदर्भात बनवला जातो. ज्याची रेसिपी अगदी सोपी आहे. हिवाळा स्पेशल सोले भात कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीमधील दुर्गा देशपांडे यांनी सांगितली आहे.
Last Updated: Jan 01, 2026, 15:34 ISTभाजपला नागपूरमध्ये बंडखोरीचा फटका बसला आहे. भाजपचे विनायक डेहनकर यांनी बंडखोरी केल्यामुळे माजी महापौर पत्नी अर्चना डेहनकर पतीचं घर सोडून ती भावाकडे माहेरी राहायला गेली. प्रभाग क्र. 17 मधून आलेल्या काँग्रेसच्या मनोज साबळे यांना भाजपने उमेदवारी दिली. तेव्हा विनायक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांच्या पत्नीला हे मान्य नसल्याने ती घर सोडून माहेरी गेली.
Last Updated: Jan 01, 2026, 15:30 ISTभाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्या संदर्भात, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, " मराठी महापौर होऊ द्यायचा नाही हा भाजपचा अजेंडा आहे. कृपाशंकरांचं विधान हे कृपाशंकर सिंहची नेमणुक केली आहे. तो भाजपचा बोलका पोपट आहे. "
Last Updated: Jan 01, 2026, 15:07 IST