
छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील गाढे जळगाव येथे शिवाजी कोरडे हे गेल्या सहा वर्षांपासून हॉटेल व्यवसायात रुजू आहेत. सुरुवातीच्या काळात या तरुणाने नाश्ता सेंटर चालवले त्यानंतर त्या नाश्ता सेंटरला हॉटेलचे स्वरूप दिले. आता कोरडे यांच्या तिरंगा हॉटेलमध्ये अनलिमिटेड मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी 250 ते 300 रुपयांना मिळते.