
गडचिरोलीमधील आदिवासी तुमरकोटी गावात हा एक धक्कादायक प्रकार घडला आहे.या गावात 20 वर्षापासून विजपुरवठा झाला नाही.त्यांनी एकदाही विज वापरली नाही, तरी या लोकांना विजेचे बिल येत आहे. झाड आणि जंगलाचं कारण सांगून ते विजेला नाकारत आहेत.तक्रार देऊनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 19:09 ISTराज्याला हादरवून लावणारे सरपंच संतोष देशमुख प्रकरण खूपच चर्चेत आहे. वर्ष उलटले तरी आरोपींना शिक्षा झाली नव्हती. शेवटी या हत्या प्रकरणाचे आरोपी वाल्मिक कराडचे बीडच्या विषेश मकोका कोर्टाकडून आरोप निश्चित केले आहेत.खंडणी,हत्या,कटकारस्थान,अपहरण,पुरावे नष्ट करणे अशी वेगवेगळी कलमे लावली आहेत.
Last Updated: Dec 23, 2025, 20:52 ISTवंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत बऱ्यापैकी उमेदवार विजयी झाले. आज चॅनलशी बोलताना "आम्ही कोणाकडे गेलो नाही,ते आमच्याकडे आले" असे वक्तव्य नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले, "काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरु केला आहे.लोकांमध्ये बोलतात,त्याविरुद्ध ते वागतात."
Last Updated: Dec 23, 2025, 20:34 ISTवंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांचे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत बऱ्यापैकी उमेदवार विजयी झाले. आज चॅनलशी बोलताना "आम्ही कोणाकडे गेलो नाही,ते आमच्याकडे आले" असे वक्तव्य नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पुढे ते म्हणाले, "काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरु केला आहे.लोकांमध्ये बोलतात,त्याविरुद्ध ते वागतात."
Last Updated: Dec 23, 2025, 20:34 ISTसोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणीच्या माळरानावर तब्बल 2 हजार वर्ष जुना विशालकाय चक्रव्यूह सापडला आहे. भारतामध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह असल्याचं मानलं जात आहे. माळरानावर सापडलेला हा चक्रव्यूह तब्बल 15 घेरे असलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती नितीन अनवेकर यांनी दिली आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 20:27 ISTशरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची बातमी समोर आली. तेव्हाच पुण्याचे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष यांच्या राजीनाम्याची मोठी चर्चा सुरु झाली.ते नाराज असल्याचं समजलं आहे.त्यांनी सौ.सुप्रिया सुळे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. चर्चा करुन निर्णय ठरवतील असे जगताप म्हणाले.
Last Updated: Dec 23, 2025, 20:16 IST