जहाल महिला माओवादी नेता तारक्का ने आज गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. तारक्का हीं माओवाद्याच्या संघटनेचं देशभरातलं दुसऱ्या क्रमांकाचं नेतृत्व असलेल्या केंद्रीय समिती सदस्य भूपती ची पत्नी असून, पश्चिम बंगाल मध्ये चकमकी ठार झालेला जहाल माओवादी नेता किशनजी ची वहिनी आहे. 1983 मध्ये माओवाद्यांच्या संघटनेत दाखल होणारी गडचिरोलीतली पहिली महिला माओवादी आहे. तारक्का सध्या माओवाद्याच्या दडकरण्या झोनल समितीची सदस्य असून तारक्काचे मूळ नाव विमला सीडाम आहे. तिच्यावर 170 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. चार राज्यात मिळून एक कोटी पेक्षा जास्तीच बक्षीस आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादी चळवळीत दाखल करण्यात तारक्काने सगळ्यात मोठी महत्वाची भूमिका बजावली आहे.