TRENDING:

इंटरमिटंट फास्टिंग वजन कमी करण्यासाठी घातक की फायदेशीर? पाहा video

छत्रपती संभाजीनगर : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत असतात. काहीजण भात खाणे टाळतात तर काही लोक खूपच व्यायाम करतात. पण तरी देखील वजन कमी होत नसल्याने कंटाळून डाएटिंगकडे वळतात. सध्या भारतात वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग हा प्रकार खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांनी डाएटिंगची ही पद्धत निवडली आहे. पण हे केल्यामुळे खरंच फायदा होतो का? याविषयी आपल्याला आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Jan 06, 2026, 20:22 IST
Advertisement

Special Report काँग्रेसकडून जिंकले भाजपकडे गेले, काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपमध्ये दाखल

Politics

अंबरनाथ नगर पालिका निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस नगरसेवकांनी युती केल्यामुळे वरिष्ठ स्तरावरील नाराजी व्यक्त केली गेली. काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक थेटपणे भारतीय जनता पक्षात गेल्याने काँग्रेसला जबर झटका बसला. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने पक्ष कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. राज्य आणि देशपातळीवर विचारधारेच्या मुद्द्यावरून लढणाऱ्या काँग्रेस-भाजपची युती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. दोन्ही पक्षांवर टीका सुरू झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक पावले उचलून नगरसेवकांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले.

Last Updated: Jan 08, 2026, 21:47 IST

Political Report : अजित पवारांचा भाजपच्या महेश लांडगेंवर निशाणा, दोन गटात शाब्दिक वॉर

Politics

पिंपरी चिंचवड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. तेव्हा प्रचारात पवारांनी पूलाचा भष्टाचार काढत वादाला आमंत्रण दिलं आहे. विरोधकांनी पवारांनी आत्मपरिक्षण करांवं असं म्हटलं आहे.

Last Updated: Jan 08, 2026, 21:39 IST
Advertisement

Political Report : मुंबईत ठाकरे Vs फडणवीस 'सामना : ब्रँडचा बँड वाजणार ?

Politics

मुंबई म्हणजे ठाकरे हे गेली तीन दशकं महाराष्ट्रात समिकरण राहीलं आहे. त्यामुळे ठाकरे ब्रँडचा एक सामाजिक, राजकीय दबदबा राहिला आहे. बदलत्या राजकारणाचत ठाकरेंसमोर एक मोठं आवाहन ठाकलं आहे. ते आवाहन आहे भाजप. पण भाजपनं ठरवलंय या ठाकरे ब्रँडचा बँड वाजवायचा.

Last Updated: Jan 08, 2026, 21:25 IST

'तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला,', देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला, VIDEO

Politics

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लावला आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतं ? हे त्यांनाही माहिती आहे. पण विकासावर बोलता येत नाही. तुमचा स्क्रिप्ट रायटर बदला, वर्षानुवर्ष तेच सुरु. दोघंही भाऊ तेच तेच बोलतात.

Last Updated: Jan 08, 2026, 18:39 IST
Advertisement

सांगलीत राष्ट्रवादीचा उमेदवार हद्दपार, अजित पवाराना मोठा धक्का, VIDEO

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगीलीतील मिरजेत मोठा धक्का ऐन निवडणुकीत मिळाला आहे. त्यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. आझम काझी असं उमेदवाराचे नाव आहे. त्यांच्यासोबतच 8 जणांना हद्दपार करण्याची कारवाई केली आहे.

Last Updated: Jan 08, 2026, 18:15 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
इंटरमिटंट फास्टिंग वजन कमी करण्यासाठी घातक की फायदेशीर? पाहा video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल