जालना: बाजारामध्ये ड्रॅगन फ्रूट मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. ड्रॅगन फ्रूटचे सेवन नियमित केल्यास आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. विविध पौष्टिक तत्त्वांनी भरपूर असल्याने हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. ड्रॅगन फ्रूटचे नियमित सेवन केल्याने कॅन्सरचा देखील धोका कमी होतो, असं सांगितलं जातं. ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाने आपल्याला कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात? याविषयीच आहार सल्लागार डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.