
पुणे: हॉस्पिटल म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. कारण दारात पाऊल टाकताच क्षणी किती खर्चाचा डोंगर समोर उभा राहील, याचा काहीच नेम नसतो. काहीजण तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा जात नाहीत. अनेकांची आयुष्यभराची कमाई हॉस्पिटलच्या बिलात खर्च होते. मात्र, पुण्यात एक असे हॉस्पिटल आहे, जिथे तुमच्याकडे पैसे आहेत की नाही याची अजिबात विचारणा केली जात नाही. अगदी माफक दरात उपचार केले जातात. या हॉस्पिटलबद्दलची माहिती संस्थापक विजय फळणीकर यांनी लोकल 18 सोबत बोलताना दिली.