
अमरावती : हिवाळ्यात अनेक पौष्टिक पदार्थ आणि साहित्य आहारात घेतले जातात. त्यातीलच एक म्हणजे मध. हिवाळ्यात मध खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. थंडीच्या दिवसांत शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि अनेक त्रासांपासून संरक्षण मिळवण्यासाठी मध उपयुक्त ठरते. तसेच हिवाळ्यात होणारा सर्दी खोकला देखील यामुळे कमी होतो. मध खाण्याचे आणखी बरेच फायदे आहेत. ते आपण जाणून घेऊया.
Last Updated: Dec 22, 2025, 17:41 ISTपनवेल - सीएसएमटी लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पनवेल-सीएसएमटी प्रवासादरम्यान महिलांच्या डब्ब्यात एक 50 वर्ष वयाचा पुरुष चढला होता. तेव्हा एका 18 वर्षाच्या तरुणीने त्याला महिलांच्या डब्यातून खाली उतरण्यास सांगितलं. पण, दोघांमध्ये वाद झाला आणि या इसमाने तरुणीला धावत्या लोकलमधून खाली फेकलं. या अपघातात तरुणीच्या डोक्याला आणि कंबरेला गंभीर जखम झाली.डब्यातील महिलांनी ही माहिती पोलिसांना कळवली.त्यानंतर खांदेश्वर स्टेशनला या आरोपीला सीआरपीएफ जवानांनी पकडलं. या जखमी तरुणीचं नाव श्वेता असं आहे, तर आरोपीचं नाव शेख नवाज आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Last Updated: Dec 22, 2025, 18:33 ISTकल्याण : हिवाळा सुरू झाला की केळीचा हंगाम सुरू होतो. त्यातच बाजारात केळफूल मिळते मिळते. केळफुलाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. केळफूलात भरपूर फायबर, प्रथिने, लोह आणि इतर खनिजे असल्याने पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित राहते, हिमोग्लोबिन वाढते, वजन कमी करण्यास मदत होते आणि मासिक पाळीतील समस्या आणि वेदना कमी होतात. ही भाजी अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे थंडीत मोठ्या प्रमाणात या फुलांना मागणी असते. केळफुलाची भाजी कशी बनवायची पाहुयात.
Last Updated: Dec 22, 2025, 16:10 ISTमहाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यांचे निकाल रविवारी 21 डिसेंबर रोजी लागले. त्यातील विजयी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी आपआपल्या हटके स्टाइलने विजयाचे सेलिब्रेशन केले होते. अकलूज नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या विरुद्ध निवडणुक लढवली होती. तेव्हा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांच्या स्टाइलमध्ये गाण्यावर डान्स केला आणि धुरंधर चित्रपटातील "घायल हू इसलिये घातक हू" हा डायलॉग म्हणत विरोधी पक्षावर निशाणा साधला.त्यांच्या या विजयाचा सेलिब्रेशन व्हीडिओ खूपच व्हायरल झाला
Last Updated: Dec 22, 2025, 16:07 ISTसकाळी उठल्यावर अनेकांना चहा, कॉफी किंवा फळे खाण्याची सवय असते. पण, तज्ज्ञांच्या मते उपाशीपोटी (Empty Stomach) घेतलेले काही पदार्थ पचनसंस्थेवर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने ॲसिडिटी वाढते, तर केळी खाल्ल्याने मॅग्नेशियमचे संतुलन बिघडू शकते. इतकेच नाही तर कच्चा भाजीपाला किंवा गोड पदार्थांमुळेही पोटाचे विकार उद्भवू शकतात. मग निरोगी राहण्यासाठी सकाळी नक्की काय खावे? भिजवलेले बदाम की कोमट पाणी? जाणून घेण्यासाठी ही महत्त्वाची माहिती नक्की पाहा !
Last Updated: Dec 22, 2025, 15:39 IST