
जालना: उडदाची डाळ हा भारतीय घरांमध्ये आढळणारा सर्वसामान्य पदार्थ आहे. उडिदामध्ये असलेल्या पोषक तत्वाविषयी आपण फारसे जागरूक नसतो. मात्र उडदाची डाळ ही अतिशय पौष्टिक असून हिवाळ्यामध्ये या डाळीचे नियमित सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात. उडदाची डाळ पचायला जड असल्याने शक्यतो हिवाळ्यामध्ये या डाळीचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. जालना येथील आहार तज्ज्ञ गीता कोल्हे यांनी उडदाच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.