
ठाणे : कल्याण आणि वडापाव यांचं नातं फार जुने आहे. कल्याणमध्ये असे अनेक वडापाव आहेत जिथे वर्षानुवर्ष कल्याणकर आवर्जून हमखास जातातच. कल्याण स्थानकापासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असणारा आधारवाडी येथील नरू वडापाव कल्याणमध्ये खूप प्रसिद्ध आहे. गेल्या 33 वर्षांपासून हा वडापाव अजूनही त्यांची वडापावची चव टिकवून आहे. इथे मिळणारी हिरवी चटणी आजही खवय्यांची मन जिंकून घेते. गेले 33 वर्ष हा वडापाव कल्याण फेमस वडापाव आहे. पूर्वी इथे फक्त वडा मिळायचा, परंतु आता वडापाव सुद्धा मिळू लागला आहे. यांची चटणी आणि वड्याची भाजी यासाठी अनेक जण लांबून येथे खायला येतात.