
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटकांची गर्दी होताना दिसते आहे. यातच आता दापोली समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळते आहे.त्यासाठी पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.
Last Updated: Dec 28, 2025, 20:53 ISTशिवसेना उबाठाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यात भाजपला त्यांनी अॅनाकोंडाची उपमाही दिली होती. त्यामुळे भाजपचे नेते नवनाथ बन यांनीही त्याचं चोख उत्तर दिले. ते म्हणाले, " ज्यांनी स्वतःचा पक्ष गिळंकृत केला ते सगळ्यात मोठा अॅनाकोंडा तुम्ही आहात."
Last Updated: Dec 28, 2025, 22:01 ISTपु्ण्यात जागावाटपावरुन शिंदे शिवसेना आणि भाजप मध्ये रस्सीखेच दिसते आहे. त्यातच आता युती तुटणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे. तेव्हा या नाराजी नाट्यामुळे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर नाराज होऊन म्हणाले, "आमची भाजप कडून कोंडी होत आहे . ज्या जागांची मागणी केली जाते, त्या न देता निवडून न येणाऱ्या जागा देण्यात येत आहेत. तसेच लाचार होऊन युती नको. ही शेवटची बैठक असेल"
Last Updated: Dec 28, 2025, 21:54 ISTपुण्यात विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात पुर्ण पवार कुटुंबाची हजेरी पाहायला मिळाली. राजकीय वाटा वेगळ्या पण कुटुंब जोडलेलं दिसलं. तेव्हा अजित दादांनी त्यांच्या शैलीत कुटुंबाचे स्वागत केले. तेव्हा सगळ्यांमध्ये हशा झाला. तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वक्यव्य केले. त्या म्हणाल्या, " AI माणसाची जागा घेऊ शकत नाही. नात्यातला ओलावा चॅट जीपीटीने अजून काढलेला नाही." कार्यक्रमाला उद्योजक गौतम अदानी उपस्थित होते.
Last Updated: Dec 28, 2025, 21:32 ISTपुण्यात शिवसेना-भाजपमध्ये बिनसलं आहे. त्याचं कारण म्हणजे शिंदें शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर. ते म्हणाले, "काही जागा कधीच भाजप-शिवसेना निवडून आल्या नाहीत, म्हणजे पडणाऱ्या जागा दिल्या. पाच सहा कुठेतरी आमचे निवडून येतील. आमच्या आमच्यात वाद व्हायला लागले आहेत. लाचार होऊन युती नको. शेवटची बैठक आज होईल."
Last Updated: Dec 28, 2025, 20:39 IST